Dahanu Talasari Earthquake Pudhari
पालघर

Dahanu Talasari Earthquake: डहाणू-तलासरी परिसर पुन्हा भूकंपाने हादरला

गेल्या काही महिन्यांपासून भूकंप थांबले होते. मात्र शनिवारी सकाळी 10 वाजून 57 मिनिटाला भूकंपाचा सौम्य धक्का बसला रिस्टर स्केलव र त्यांची नोंद 3.1 अशी करण्यात आली होती.

पुढारी वृत्तसेवा

तलासरी: डहाणू-तलासरी तालुक्यातील काही गावांना भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याने पुन्हा एकदा दोन्ही तालुक्यातील गावे हादरली. मागील पाच ते सहा वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून भूकंप थांबले होते. मात्र शनिवारी सकाळी 10 वाजून 57 मिनिटाला भूकंपाचा सौम्य धक्का बसला रिस्टर स्केलव र त्यांची नोंद 3.1 अशी करण्यात आली होती. तर मंगळवारी दुपारी 1 वाजून 09 मिनिटाला पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का बसला रिस्टर स्केलव त्यांची 3.5 नोंद करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी झालेला भूकंपाचा केंद्रबिंदू चारोटी परिसरात दहा किलोमिटर खोल जमिनीत भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र मंगळवारी दुपारी तलासरी परिसरात झालेल्या भूकंपाची नोंद 3.5 अशी करण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किलोमीटर खोल अंतरावर होता.

डहाणू,तलासरी येथील काही गावे भूकंपाच्या धक्क्याने हादरली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

डहाणू, तलासरी परिसरातील गावांना रोजच सौम्य ते मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसत होते मात्र काही महिने ते थांबले होते. आता पुन्हा एकदा भूकंपाने गावे हादरले असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डहाणू- तलासरी तालुक्यातील गावामध्ये सहा ते सात वर्षापासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. काही महिने विश्रांती नंतर शनिवारी आणि मंगळवारी दुपारी पुन्हा सौम्य भूकंप होऊन जमीन चांगलीच हादरली.

यामध्ये कोणतीही जीवत हानी झाली नाही मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचे दिवस सुरू असल्याने, भूकंपाची भीती वाटत असूनही घराबाहे झोपता येत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांना भीतीच्या सावटाखाली दिवस काढावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT