Ambernath Railway Track Iron Box: रेल्वे रुळावरील लोखंडी पेटीने खळबळ!मोटरमनच्या सतर्कतेने अपघात टळला

या घटनेमुळे पहाटे ५.४४ ते ५.५६ असा सुमारे १२ मिनिटे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होती.
Ambernath Railway Track Iron Box
Ambernath Railway Track Iron BoxPudhari
Published on
Updated on

अंबरनाथ: अंबरनाथ आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर एक लोखंडी पेटी दिसल्याने एकच घबराट पसरली होती. परंतु मोटरमनच्या सतर्कतेमुळे रेल्वे चा हा मोठा अपघात टळला आहे.

मंगळवारी पहाटे ठाण्याहून कर्जत च्या दिशेने येणारी लोकल उल्हासनगर -अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आली तेव्हा पटरीवर एक लोखंडी पेटी असल्याचे मोटरमन च्या निदर्शनास आले. तेव्हा पहाटे ५.४४ मिनिटांनी त्यांनी मोठ्या सतर्कतेने गाडी थांबवली.

Ambernath Railway Track Iron Box
Surprise Inspection: कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत प्रशासन ॲक्शन मोडवर; १५ कर्मचाऱ्यांना नोटिसा

या गाडीवर मोटरमन आर. एस. सैनी होते. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही पेटी तातडीने रुळावरून बाजूला करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी ही पेटी ताब्यात घेतली असून हा कोणत्या घातपाताचा प्रकार होता का याबाबत रेल्वे पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे पहाटे ५.४४ ते ५.५६ असा सुमारे १२ मिनिटे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news