Devendra Fadnavis News Pudhari
पालघर

Devendra Fadnavis News: वसईतील कोपर फाटा इंटरजंक्शनची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

या भेटीमुळे एक्स्प्रेस वेच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे: मुंबई–वडोदरा एक्स्प्रेस वेवरील वसई पूर्वेतील कोपर फाटा इंटरजंक्शनची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (रविवारी) सायंकाळी ५ वाजता प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीमुळे एक्स्प्रेस वेच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोपर फाटा येथील इंटरजंक्शन हे मुंबई–वडोदरा एक्स्प्रेस वेवरील महत्त्वाचे जोडबिंदू मानले जाते. या ठिकाणच्या कामांची प्रगती, उर्वरित कामांचे नियोजन तसेच वाहतूक व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री यांनी घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तयारी पूर्ण केली असून, परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. या पाहणीनंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील कामांना अधिक वेग मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.

या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,या एक्स्प्रेस वे चे काम जोरात सुरू आहे.या रस्त्यामुळे मुळे शहाराबाहेरून जाणाऱ्यांना ट्रॅफिक समस्या होणार नाही.एका पुलाचे काम झाले की हा रस्ता वापरासाठी तयार होईल.साधारणपणे नोव्हेंबर पर्यंत रस्ता खुला करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT