Dangerous Hoardings Pudhari
पालघर

Dangerous Hoardings: उड्डाण पुलावरील शुभेच्छा फलक ठरतायेत धोकादायक

वाऱ्याने उलटून उड्डाणपुलाच्या वरील महामार्गावर येत असून ते रस्त्यावर लोळताना दिसत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे: वसईतुन जाणाऱ्या मुंबई दिल्ली महामार्गावरील उड्डाणपुलाला लावण्यात येणारे वाढदिवसांचें ,लग्न समारंभाचे , सण उत्सवांचे या सह विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे फलक हे वाऱ्याने उलटून उड्डाणपुलाच्या वरील महामार्गावर येत असून ते रस्त्यावर लोळताना दिसत आहेत. असे फलक हे वाहनचालकांसाठी धोकादायक आहेत.

असे फलक शुभेच्छांचा काळ संपून जाऊन सुद्धा काढण्यात येत नसल्याने त्यांची बांधण ढिली होऊन ते वाऱ्याने उलटून वेगवान महामार्गावर अक्षरशः लोळत असतात . यामुळे वाहनचालकांचे विशेष करून दुचाकी चालकांचे लक्ष विचलित होऊन किंवा फलकांच्या सहाय्यक पट्ट्यांवरून चाक गेल्याने असंतुलित होऊन त्यांना अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

वसईतील घोडबंदर पासून ते सकवार पर्यंतच्या असलेल्या उड्डाणपुलांवर असे फलक अधून मधून भर रस्त्यात लोळताना दिसत असून महामार्गावरील शिरसाड उड्डाणपुलावावर अश्या लोळणाऱ्या फलकामुळे दुचाकी चालकांचे लक्ष विचलित झाल्याने अपघात होता होता वाचलेआहेत.असा फलक रस्त्यात पडला आहे अशी माहिती मिळताच या भागातील रिक्षा चालक गायकवाड यांनी फलक बाजूला केला व असे फलक शुभेच्छा काम संपल्यावर शुभेच्छूकांनी वेळेवर काढण्याची विनंती केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT