कासा: पालघर जिल्ह्यातील डहाणू माधील अंधश्रद्धा वच्या नावाखाली घडलेल्या एका संतापजनक घटनेने परिसर हादरला आहे. अघोरी पूजा व गावठी औषध देण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ५५ वर्षीय भोंदू ला कासा पोलिसांनी अवघ्या दोन तासांनी अटक केली आहे. ही धक्कादायक घटना कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.
माहितीनुसार पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी आरोपी संपर्क साधण्यात आला होता संबंधित आरोपीने गावठी औषध देण्याचे आमिष दाखवत कुटुंबियांना पावन चरी परिसरात नेले, त्यानंतर रात्री उशिरा स्मशानभूमी जवळील जंगल परिसरात पीडीतेला नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तसेच हा घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत आरोपी विरुद्ध तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा ४ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडला असून घडला असून, त्याच दिवशी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अवघ्या दोन तासात अटक केली आरोपीला ५ मे रोजी पहाटे च्या सुमारास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
दरम्यान पीडित मुलीवर स्थानिक उपजिल्हा रुग्णालय कासा या ठिकाणी उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत. अंधश्रद्धा भोंदूगिरी आणि महिला वरती वाढत्या अत्याचार यामुळे समाजात असुरतेचे ती भावना निर्माण होत असून अशा प्रकारे प्रकरणाला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.