Dahanu Local Train pudhari photo
पालघर

Palghar Railway News : डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढण्याच्या प्रतीक्षेत प्रवासी

खासदारांच्या बैठकीनंतर प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या

पुढारी वृत्तसेवा

सफाळे : डहाणू विभागातील रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या समस्या, डहाणू लोकलच्या अपुऱ्या फेऱ्या तसेच पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खासदारांची होणारी बैठक या पार्श्वभूमीवर पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या पुढाकाराने शासकीय विश्राम संकुलात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विविध प्रवासी संघटना, सामाजिक संस्था, पत्रकार तसेच रेल्वे फॅन उपस्थित होते.

वैतरणा ते डहाणू दरम्यान मोठ्या संख्येने नोकरदार, विद्यार्थी तसेच छोटे-मोठे व्यावसायिक दररोज रेल्वेने प्रवास करतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी डहाणू लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे. प्रवाशांच्या अपेक्षेनुसार डहाणूहून मुंबईच्या दिशेने (अप) पहाटे ३.५० वाजता डहाणू-चर्चगेट, सकाळी ७.४० वाजता डहाणू-अंधेरी, सायंकाळी ४.४५ वाजता व ६.१५ वाजता डहाणू-विरार तसेच रात्री ११.३० वाजता डहाणू-विरार लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच विरारहून डहाणूकडे (डाऊन) सकाळी ७.३०, दुपारी २.३०, सायंकाळी ५.३०, रात्री ८.०० आणि रात्री १०.१५ वाजता लोकलच्या फेऱ्या सुरू करण्याची अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, रात्री उशिरा चर्चगेट स्थानकातून सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास डहाणूसाठी लोकल सुरू करावी, अशीही मागणी आहे. पिक अव्हरच्या वेळेत प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने त्या वेळच्या डहाणू लोकल १५ डब्यांच्या करण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दिवाळीची भेट मिळणार का?

वांद्री धरणाच्या डाव्या कालव्याची लांबी ९ किलोमीटर असून वेहलोली, खैरे, सातिवली, कुडे, बोट आणि हालोली परिसरातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. तर उजव्या कालव्याची लांबी १२ किलोमीटर असून गांजे, ढेकाळे, वरई, गुंदावे, दहिसर, साखरे, नावझे, गिराळे, पारगाव आणि सोनावे या गावांतील शेतीला सिंचनाचा लाभ मिळतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT