Dahanu Love Jihad Pudhari
पालघर

Dahanu Love Jihad: डहाणूमध्ये लव्ह जिहादची घटना; दोन सख्ख्या बहिणींना तरुणाने फसवले

डहाणूतील दोन सख्ख्या बहिणींना एका विशिष्ट समुदायाच्या तरुणाने जाणीवपूर्वक प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

डहाणू: पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे कथित लव्ह जिहादचे एक अत्यंत खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. डहाणूतील दोन सख्ख्या बहिणींना एका विशिष्ट समुदायाच्या तरुणाने जाणीवपूर्वक प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

हिंदू मुलींना फूस लावून त्यांच्यावर अत्याचार करण्याचे हे सत्र अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणाची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय नेत्यांनी डहाणूमध्ये आक्रमक पवित्रा घेतला आहे.

डहाणूत कथित लव्ह जिहाद प्रकरण समोर आल्याचा आरोप करत भाजप नेत्या तथा आमदार चित्रा वाघ यांनी शनिवारी डहाणू पोलीस ठाण्याला भेट देऊन संबंधित गुन्ह्याच्या तपासाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाचा आढावा घेतला तसेच आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी केली.

डहाणू पोलीस ठाण्यात १ जून रोजी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, एका तरुणाने मोठ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडिओंच्या आधारे संबंधित तरुणीला ब्लॅकमेल करण्यात आल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

अनेक मुलींना लंडनला नेण्यात आल्याचा दावा

यावेळी चित्रा वाघ यांनी आणखी एक गंभीर आरोप करत फूस लावून पालघर जिल्ह्यातील अनेक मुलींना लंडनला नेण्यात आल्याचा दावा केला. या संदर्भातील सविस्तर माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी डहाणू पोलिसांची दोन पथके परराज्यात रवाना करण्यात आली आहेत.

आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू असून त्याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती डहाणू पोलिसांनी दिली. या भेटी दरम्यान भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT