Local Train Pudhari
पालघर

Dahanu Virar local train: डहाणू–दादर थेट लोकलचा मार्ग मोकळा; प्रवाशांना मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पालघर: डहाणू–वैतरणा रेल्वे प्रवाशांची विरार येथे लोकल बदलताना होणारी गैरसोय, गर्दी आणि वेळेचा अपव्यय कमी करण्यासाठी 90667 दादर–विरार (DDR–VR) व 93033 विरार–डहाणू रोड (VR–DRD) लोकलचे क्लबिंग करण्याची डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेची सातत्यपूर्ण मागणी अखेर मार्गी लागली आहे.

रेल्वे प्रशासनाने अधिकृत घोषणा केल्यानुसार १ सप्टेंबर २०२६ पासून या दोन्ही लोकलचे क्लबिंग होऊन थेट दादर–डहाणू रोड सलगपणे लोकल सेवा सुरू होणार आहे.

डहाणू ते दादर ही सलग लोकल सेवा प्रवासाची सुविधा डहाणू ते वैतरणा रेल्वे स्थानकांदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्याची मागणी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती.

लोकल ट्रेनच्या क्लबिंगला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिल्याने सदरची लोकल सेवा सलग दादर रेल्वे स्थानक येथून डहाणू रेल्वे स्थानकापर्यंत सुरू होणार आहे. यापूर्वी दादर- विरार त्यानंतर हीच लोकल विरार ते डहाणू अशी होती.

लोकल क्लबिंगमुळे ही लोकल ट्रेन दादर डहाणू रोड अशी करण्यात येणार असून सदरची लोकल ट्रेन 5 वाजून 22 मिनिटांनी दादर येथून सुटेल, त्यानंतर हीच लोकल पुढे विरार येथून 6 वाजून 18 मिनिटांनी डहाणूच्या दिशेने सुटणार आहे.

या निर्णयामुळे विरार येथे लोकल बदलण्याची आवश्यकता राहणार नसून डहाणू–वैतरणा परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT