Palghar Car crashes into divider on highway 
पालघर

Palghar Car crashes into divider on highway|महामार्गावर कार दुभाजकाला धडकून अपघात

चालकासह, प्रवासी किरकोळ जखमी, वेगमर्यादा अंमलबजावणीची गरज

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कोपरफाटा ते खराटतारा दरम्यान गुजरात वाहिनीवर भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला जोरदार धडकली. या धडकेनंतर कार पलटी झाल्याने अपघात घडला. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कारचालकाला मार लागला असून, कारमधील एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.

एक कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट दुभाजकाला धडकून रस्त्यावर पलटी झाली. अपघाताची माहिती होताच मांडवी पोलीस व महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी मॉर्निंग वॉकसाठी जात असलेले सदानंद दाजी किणी यांनीही प्रसंगावधान राखत मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने ! कारमधील चालक आणि प्रवाशाला बाहेर काढले. तसेच पलटी झालेली कार सरळ करण्यातही मदत केली.

या अपघातानंतर महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अनेक चारचाकी वाहने अतिवेगाने धावत असल्याचे चित्र दिसून येते.

वेगावर नियंत्रण नसल्याने चालकांसह वाहनातील अन्य प्रवाशांचाही जीव धोक्यात येत आहे-त्यामुळे महामार्गावर चारचाकी वाहनांच्या वेगमयदिची प्रभावी अंमलबजावणी करून वेगवान वाहनांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT