नालासोपारा: बोळींज पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेवर फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी वीरेंद्र येगडे याने दि. 21 सप्टेंबर 2018 ते दि. 06 एप्रिल 2026 या कालावधीत फिर्यादी महिलेला तुझ्याशी बोलायचे आहे., असे सांगून विविध हॉटेलमध्ये तसेच वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले.
त्या ठिकाणी आरोपीने फिर्यादीचे सेल्फी फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर फिर्यादीने नकार दिल्यानंतरही आरोपीने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून नाही आलीस तर तुझे फोटो व व्हिडिओ तुझ्या पतीला व नातेवाईकांना पाठवीन, अशी धमकी देत आरोपीने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी वीरेंद्र येगडे याच्याविरुद्ध बोळींज पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.