Industrial Drug Manufacturing
पालघर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात एम.डी ड्रग्ज तयार करणार्या टोळीचा पदाफार्श करण्यात आला आहे.हे ड्रग्ज कनेक्शन मुंबईमधून उघडकीस आले आहे.या कारवाईत एम.डी.ड्रग्जसह वाहन,मोबाईल व इतर साहित्यासाह 36 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी एक तरुण रसायण शास्त्रातील पदवीधर आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अंधेरी एमआयडीसी परिसरात अंधेरी पोलिसांनी फरहान गुलजार खान या संशयीत कारचालकाकडून दोन लाख 80 हजार रुपये किमतीचा 71 ग्राम ड्रग्जचा साठा जप्त करण्यातआला होता.