Be careful if you are ordering food online...
नालासोपारा (पालघर) : आपण ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवत असाल तर सावधान...ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा देणार्या झेप्टो स्टोअर (नालासोपारा) येथून 22 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11 वाजता एका ग्राहकाने ऑनलाईन आईस्क्रिम मागवले होते.
मात्र ग्राहकाने जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला - आईस्क्रिमच्या बॉक्सवर तसेच आईस्क्रिमवरच किडे लागलेले आढळून आले. या प्रकरणावर संताप व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निळेगाव शाखाप्रमुख हितेश दिलीप घरत यांनी स्टोअरला भेट देऊन जाब विचारला आणि ग्राहकांच्या फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आणला.