पालघर: बहुचर्चित सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी आतिफ तासे याला पालघर पोलिसांनी अटक केली. मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जमीन बळकावणे आणि खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी आतिफ तासे याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता. नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या आतिफ तासे यांच्या मुसक्या आवळल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी आरोपी आतिफ तासे याला मुंबईतील कांदिवली परिसरातून ताब्यात घेण्यात आले. आरोपी आतिफ तासे, त्याची आई गुलशन तासे - पटेल यांच्यासह 20 ते 25 जणांनी 19 ऑक्टोबर 2023 रोजी मनोर जवळील टेन गावातील जमीन बळकावण्यासाठी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यावर सशस्त्र हल्ला केला होता.
हल्लाप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आतिफ तासे याचा अटकपूर्व जमीन सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 23 मे 2025 रोजी रद्द केला होता. जामीन रद्द झाल्यानंतर गेल्या दहा महिन्यांपासून आतिफ तासे फरार झाला होता.
पुण्याची मॉडेल सायली सुर्वेचा यू टर्न
सायली सुर्वे हिने यू टर्न घेतल्याने धर्मांतरण प्रकरणाला नवीन वळण आले आहे. सायलीने तिचा पती आरोपी आतीफ तासे आणि सासू गुलशन तासे - पटेल यांच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा स्वेच्छेने आणि माझ्या मुलांचे हित लक्षात घेऊन माणुसकी म्हणून मागे घेतले असल्याची माहिती समाज माध्यमावर व्हिडीओ पोस्टमधून स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे पती आरोपी आतीफ तासे आणि सासू गुलशन पटेलवर धर्म परिवर्तनासाठी दबाव, मारहाण आणि गर्भपात केल्याचे आरोप सायली सुर्वे यांनी केले होते. आरोपानंतर पुन्हा घरवापसी करत आणि विधीवत पूजाअर्चा करून हिंदू धर्म स्वीकारला होता.