उत्तर महाराष्ट्र

मालेगाव : महासभेत रुग्णालय लोकार्पण निमंत्रणे भिरकावली, महागठबंधनचे नगरसेवक संतप्त

गणेश सोनवणे

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा

विद्यमान सभागृहातील शेवटच्या महासभेत घरकुल योजनेचे हस्तांतरण आणि मनपा आरोग्य विभागातील तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी मनुष्यबळाचा अभाव हे दोन मुद्दे चांगलेच गाजले. विशेष म्हणजे, डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ नसताना रुग्णालयांचे उद्घाटन कसे करताहेत, असा सवाल केला असता, त्या निमंत्रण पत्रिकेवर 'मालेगाव मध्य'चे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांचा नामोल्लेख नसल्याने मालेगाव महागटबंधन आघाडीच्या नगरसेवकांनी निमंत्रण पत्रिका उधळल्या. एकाने पत्रिका फाडून भिरकावल्याने एकच गोंधळ झाला.

कॅम्प रुग्णालयाच्या जागेवर अमेरिकन इंडिया फाउंडेशन ट्रस्टच्या सामाजिक दायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या मॉडेल रुग्णालयाचे लोकार्पण येत्या 4 तारखेला होणार आहे. यासंदर्भातील निमंत्रण पत्रिका महासभा सुरू असताना नगरसेवकांना दिल्या गेल्या, तेव्हा भाजपचे गटनेते सुनील गायकवाड यांनी पत्रिकेवर केवळ महापौर – उपमहापौरांचीच नावे मग इतर पदाधिकार्‍यांची का नाहीत, असा आक्षेप घेत महापालिकेचे या रुग्णालयात काही योगदान आहे की नाही, असा सवाल केला.

शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी, ही जागा मनपाची असून, त्यावर रुग्णालयासाठी केवळ फाउंडेशन तयार करून दिले असून, उर्वरित खर्च ट्रस्टने केल्याचे स्पष्टीकरण दिले. मग आता हे रुग्णालय चालवणार कोण? त्यासाठी आवश्यक स्टाफ कोण देणार, असे प्रश्न उपस्थित झाले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT