दिल्ली : डिजिटल इंडिया वीकमध्ये सन्मान मिळविलेल्या दिव्यांग रवींद्र सुपेकर यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. 
उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या वावीचा युवक डिजिटल इंडियात झळकला, पंतप्रधान मोदींनी साधला संवाद

गणेश सोनवणे

वावी : (जि. नाशिक) संतोष बिरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथे 'डिजिटल इंडिया वीक 2022' चे उद्घाटन केले. त्यानंतर काही निवडक तंत्रज्ञान विभागास भेटी दिल्या. येथील दिव्यांग रवींद्र सुपेकर यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला आणि विविध प्रकल्पांबाबत माहिती घेतली. दि. 4 ते 6 जुलैदरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात तंत्रज्ञानाची सुलभता वाढवणे, जीवनातील सुलभता सुनिश्चित करण्यासाठी आणि स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी सेवा वितरण सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने अनेक डिजिटल उपक्रम सुरू केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत विविध तांत्रिक कौशल्य विभागास भेट देण्यात आली.

या उपक्रमांतर्गत सीएससी ई-गव्हर्नन्स इंडिया लिमिटेडच्या वतीने सीएससी अकॅडमीचे सीईओ ऋषिकेश पाटणकर, व्हीएलई दिव्यांग रवींद्र सुपेकर, सीएससी मुख्यालय दिल्लीचे सुबोध मिस्त्रा यांनी प्रतिनिधित्व केले. सुपेकर यांनी अ‍ॅलिमको या सेवेबद्दल माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी तंत्रज्ञान कोणते वापरले व ग्रामीण भागात कोणत्या भाषेच्या माध्यमातून शिक्षण देतात याबद्दल विचारले. शेतकर्‍यांसाठी उभारण्यात आलेल्या सीएससी एफपीओबद्दल मोदींनी माहिती घेत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सीएससी महाराष्ट्र प्रमुख वैभव देशपांडे, समीर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT