उत्तर महाराष्ट्र

नाशिककरांना उकाड्याने घामाच्या धारा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने वर्दी दिलेली असतानाच नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. शुक्रवारी (दि.3) तापमानाचा पारा 36.1 अंश सेल्सियस इतका नोंदविण्यात आला. उकाड्याने नाशिककरांना घामाच्या धारा लागत आहेत.

केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल गतीने होत असून, पुढील दोन ते तीन दिवसांत तळ कोकणासह मुंबईत तो डेरेदाखल होेण्याची शक्यता आहे. त्यातच अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या काही भागांना मान्सूनपूर्व सरींनी झोडपून काढले आहे. मात्र, त्याचवेळी नाशिकमधील उष्णतेची लहर कायम आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा 36 अंशांपलीकडे जाऊन पोहोचला आहे. परिणामी हवेतील आर्द्रता गायब होऊन प्रचंड उकाडा जाणवत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT