उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘सर्जा-राजा’ची खिल्लारी जोडी लाख मोलाची; प्रथमच मिळाली इतकी किंमत

गणेश सोनवणे

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच बळीराजाचा जीव की प्राण असलेल्या 'सर्जा-राजा'च्या बैलजोडीला प्रथमच 3 लाख 51 हजार इतकी विक्रमी किंमत मिळाली. कळवण तालुक्यातील ओतूर येथील शेतकरी अशोक मोरे यांनी पिंपळगाव नजीक येथील हरिभाऊ वेळंजकर यांच्याकडून ही जोडी खरेदी केली.

येथील बाजार समितीत रविवारी (दि. 4) आठवडे बैल बाजारात ही सर्जा-राजाची खिल्लारी जोडी विक्रीसाठी आली असता, ओतूर येथील अशोक मोरे यांनी ही बैलजोडी खरेदी केली. या बैल बाजारात 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेने बैलजोडी खरेदी केली गेल्याने या बैलजोडीचे बाजार समितीकडून स्वागत करीत, आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सचिव नरेंद्र वाढवणे यांनी बैलजोडीचे मालक अशोक मोरे यांचा सत्कार केला. यावेळी अशोक गायकवाड, प्रकाश कुमावत, सुनील डचके, डॉ. दत्ता मोटेगावकर, डी. पी. होळकर, खरेदीदार अशोक मोरे, हरिभाऊ वेळंजकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT