नाशिक : पोलिस असल्याचे सांगत दोघा भामट्यांनी वृद्ध व्यक्तीस गंडा घातला. भामटे वृद्ध व्यक्तीकडील 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना लोखंडे मळा येथील हनुमंतानगर परिसरात घडली.
पंढरीनाथ महादू जाधव (72, रा. हनुमंतानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते बुधवारी (दि.17) दुपारी 2 च्या सुमारास जेवण करून घराबाहेर पायी फिरत होते. त्यावेळी दुचाकीवरून दोन संशयित त्यांच्याजवळ आले. दोघांनी आम्ही पोलिस असल्याचे सांगत पंढरीनाथ यांना बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांच्याकडील 60 हजार रुपयांचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने काढून घेत पसार झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पंढरीनाथ यांनी उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.