उत्तर महाराष्ट्र

नाशिक : चणकापूर धरणातून बिगरसिंचन आवर्तन, पाणीचोरी रोखण्यासाठी वीजपुरवठा बंद

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चणकापूर धरणातून नदी व कालव्यावरील पाणीपुरवठा योजनांसाठी दोन दिवसांपासून बिगर सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. हे आवर्तन येत्या 24 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्यांमधील ज्या गावांतून आवर्तनाचा प्रवाह जात आहे, अशा ठिकाणी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे.

आवर्तन कालावधीत चणकापूर धरणातून नदी व कालव्यावरील पाणीपुरवठा योजनांसाठी बिगर सिंचनाकरिता 840 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येत आहे. आवर्तनातील पाणी नियमानुसार सोडण्यात येत असून, पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहणार आहे. नागरिकांनीदेखील सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

या गावांमधील वीजपुरवठा बंद
कळवण : मौजे कळवण, गोसराणे, अभोणा, पाळे खुर्द, भादवन, पिंपळकोस, जुनी बेज, निवाणे, कनाशी, खडकवन व कळमाथे.
देवळा : मौजे खमखेडा, लोहोणेर, देवळा नगरपंचायत व देवळा प्रादेशिक पाणीपुरवठा उद्भव, गिरणा नदीकाठ व विठेवाडी.
सटाणा : ठेंगोडा, आरई, शेमळी, ब—ाह्मणगाव, यशवंतनगर व लखमापूर.
मालेगाव : मौजे पांढरूण, तळवाडे, धवळेश्वर व रावळगाव.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT