नाशिक (नांदगाव) : गवंडी काम करणार्या मजुराने गावठी कट्ट्याच्या सहाय्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नांदगाव मालेगाव रोडलगत असलेल्या दगडाच्या खदानीत घडली. गवंडी काम करणारा शंकर भगवान डोंगरे (38, जळगाव बु., ता नांदगाव, ह. मु. मातुलठाण, ता. येवला) हा दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने आजाराला कंटाळला होता. त्यास मालेगाव येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. त्याच्या कुटुंबात आई, वडील, मुलगा, मुलगी, पत्नी असून, ते मातुलठाण येथे राहतात.