उत्तर महाराष्ट्र

धुळे : तापी नदीत उडी टाकून माय-लेकाची आत्महत्या

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा
शिरपूर तालुक्यातील गिधाडे शिवारात तापी नदीपात्रात उडी घेऊन माय-लेकाने जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी बॅग, साडी आणि वह्या मिळून आल्या आहेत.

महिलेने दहा वर्षाच्या मुलासोबत नदीपात्रात उडी घेतल्याचा प्रकार रस्त्याने जाणार्‍या व्यक्तीने पाहिला. त्याने तत्काळ आरडाओरड करून नदीपात्राकडे धाव घेतली. घटनास्थळी आढळलेल्या बॅगेत असलेल्या वहीमध्ये तेजेंद्र रवींद्र सिंग राजपूत, असे नाव लिहिले असून, एक मोबाइल क्रमांक मिळाला. योगिता रवींद्र सिंग-गिरासे (30, शिरपूर, वाडी) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा मुलगा राजेंद्र रवींद्र सिंग-राजपूत (10) हा असल्याचे निदर्शनास आले आहे. विवाहिता मुलासोबत शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथे माहेरी आली होती. त्यानंतर पुन्हा मुलासोबत त्यांच्या सासरी शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे जाताना दुपारी दोघांनी तापी नदीपात्रात उडी घेतली. आत्महत्त्येमागील कारण समजू शकले नाही.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT