माया सोनवणे, ईश्वरी सावकार,www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

Women’s Premier League : महिला आयपीएल लिलाव यादीत नाशिकच्या दोघी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयतर्फे आयोजित पहिल्या-वहिल्या महिलांच्या आयपीएल अर्थात वुमेन प्रीमियर लीगच्या (Women's Premier League) लिलाव यादीत जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माया सोनवणे व ईश्वरी सावकार या दोन महिला क्रिकेटपटूंची निवड झाली आहे. सोमवारी (दि. १३) वुमेन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. दोघींचाही अनकॅपड खेळाडूंत समावेश असून, त्यांना १० लाख इतकी कमीत कमी रिझर्व प्राइस मिळाली आहे.

जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माया सोनवणे व ईश्वरी सावकार यांच्यासह रसिका शिंदे, प्रियांका घोडके, साक्षी कानडी, लक्ष्मी यादव व शाल्मली क्षत्रिय या सात खेळाडूंचे अर्ज बीसीसीआयतर्फे पहिल्या यादीसाठी घेण्यात आले होते. त्यातून या लिलावाच्या अंतिम यादीत माया व ईश्वरी या दोघींची निवड झाली. या यादीत एकूण ४०९ भारतीय व न्यूझीलंड, साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, झिंबाब्वे, आयर्लंड यासारख्या देशांतील परदेशी महिला खेळाडूही आहेत. यातून ५ शहरांच्या नावाने ५ संघांचे चमू निवडले जाणार आहेत.

माया ही उत्तम फिरकीपटू लेगस्पिनर असून, सलग दुसऱ्या वर्षी प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात निवड झाली होती. मागच्या हंगामाआधी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणार्‍या भारतीय संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी संभाव्य ३५ खेळाडुंमध्ये निवड झाली होती. तर ईश्वरी सलामीची फलंदाज असून, तिने यंदा १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याबरोबरच चॅलेंजर ट्रॉफी व त्यापाठोपाठ श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धच्या चौरंगी मालिकेतही ईश्वरीने प्रभावी फलंदाजी केली होती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT