उत्तर महाराष्ट्र

केवायसीच्या नावाखाली महिलेची फसवणूक करणाऱ्यास ओडिशा येथून अटक

गणेश सोनवणे

जळगाव : येथील गजानन कॉलनी मध्ये राहणाऱ्या महिलेला केवायसीच्या नावाखाली पासवर्ड घेऊन तिच्या खात्यामधून दहा हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी आरोपीला ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद केले.

येथील गजानन कॉलनी मधील अमृत स्वरूप या ठिकाणी रहात असलेल्या अनुपमा प्रभात चौधरी यांना आपल्या बँक खात्याची केवायसी करण्यासाठी लिंक पाठवून ओटीपी व पासवर्ड मिळाल्यावर अनुपमा याच्या  बँक खात्यातून 10 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी अनुपमा प्रभात चौधरी यांनी फिर्याद दिली होती. जिल्हापेठ पोलिस  स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केला असता आरोपीचे नाव काँग्रेस नारायण कुढेही (26) वर्ष रा. पंडापदर ता. रामपूर जि. कालाहंडी ओडिशा असे निष्पन्न झाले. त्याचा शोध घेण्यासाठी कॉ. महेंद्र पाटील (डॉन),पोना सलीम तडवी, पो. कॉ. विकास पहुरकर यांच्या पथकाला  ओडिशा येथील पत्त्यावर पाठविण्यात आले. तेथील भाग नक्षलग्रस्त असल्याने तेथील पेहराव परिधान करुन पोलिसांनी काँग्रेस नारायण कुढेही यास ताब्यात घेतले.

न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश विनय मुगलीकर यांनी त्यास 2 दिवस पोलीस कोठडी दिली. पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT