उत्तर महाराष्ट्र

वणीत सर्रास अवैध मद्य विक्री ; ड्राय डे उरला नावालाच

गणेश सोनवणे

वणी : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी आदी महत्त्वाच्या दिवशी सरकारकडून ड्राय-डे जाहीर केला जातो. मात्र, याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या विभागावर आहे, त्याच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रजासत्ताकदिनी वणीत सर्रास अवैध मद्य विक्री होत असल्याचे चित्र होते. आज रविवारी (दि. 30) महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असून, या दिवशीही ड्राय-डे पाळला जाणार आहे. मात्र, त्याची अंमलजबावणी शहरात होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वणी व परिसरात अवैध मद्य विक्री मोठ्या प्रमाणावर होते. त्यातही ड्राय-डेसारख्या दिवशी अशा अवैध मद्य विक्रेत्यांकडून बिनधास्त होणारी मद्य विक्री पाहता, ड्राय डे केवळ नावालाच आहे की काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या विक्रेत्यांना कोण अभय देतो, याची चौकशी करण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत.

कळवणला उत्पादन शुल्क विभाग, तर वणीला उपविभागीय कार्यालय असूनही, त्याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नसल्याचे चित्र प्रजासत्ताकदिनी दिसून आले. विशेष म्हणजे यात बनावट देशी-विदेशीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने यातून पिणार्‍याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT