लव्ह जिहाद,www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

धुळे शहरात लव जिहादचा प्रकार उघड

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरात लव जिहादचा प्रकार उघडकीस आला आहे. विधवा महिलेस ओळख लपवून लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर तथाकथित युवकासह त्याच्या पित्याने देखील अत्याचार केल्याची बाब पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार समोर आले आहे. दरम्यान या प्रकाराबाबत भारतीय जनता युवा मोर्चा संतप्त झाला असून या संघटनेचे जिल्हाध्यक्षांनी या प्रकरणी मोठे रॅकेट असण्याची भीती व्यक्त करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शहरातील पीडीतेचा पती काही वर्षांपूर्वी मयत झाला होता. या दांपत्याला एक मुलगा देखील आहे. पिडीतेने धुळे शहरातीलच एका प्रशिक्षण संस्थेत पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रवेश घेतला. याच ठिकाणी तिची ओळख एका तरुणाबरोबर झाली. तरुणाने त्याचे नाव गौरव माळी सांगून ओळख वाढवली. यानंतर पिडीतेला घेऊन तो धुळे शहरालगत असणाऱ्या लळींग किल्ल्यावर गेला. या ठिकाणी त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून त्याने पिडीतेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. दरम्यान संबंधित पीडीतेला त्याने लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी करार देखील करून घेतला. यानंतर ते दोघे धुळ्याबाहेरील शहरात वास्तव्यास गेले. येथे तरुणाने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तरुणाच्या वडिलांनी देखील पिडीतेवर अत्याचार केला.

दरम्यानच्या कालावधीत संशयित तरुण हिंदू नसून मुस्लिम असल्याची बाब  समोर आली आहे. संशयितानी  पीडीतेला धुळे येथील विटभट्टी परिसरात राहण्यासाठी आणून तिचा छळ सुरुच ठेवला. दरम्यानच्या कालावधीत या अत्याचारातून पिडीतेला एक अपत्य झाले. तसेच पिडीतेच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचे धर्मांतर करण्यासाठी संबंधितांनी प्रयत्न केले. त्यामुळे पिडीतेने मुलाला तिच्या आजीकडे राहण्यासाठी पाठवले व तातडीने पोलीस ठाणे गाठून अत्याचाराची आपबिती कथन केली. त्यानुसार संबंधित फसवणूक करणारा अरशद मलिक, त्याचे वडील सलीम मलिक तसेच सासू तसलीम मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पीडीतेला अत्याचार करणाऱ्या परिवाराने तिचा खून करून श्रद्धा वालकर प्रमाणेच तिच्या शरीराचे 70 तुकडे करण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या असून यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित चांदोडे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. अशा प्रकारांमध्ये मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त करून पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT