उत्तर महाराष्ट्र

जळगाव : ट्रकमधून साहित्याची चोरी ; 19 लाखांच्या मुद्देमालासह दोघे ताब्यात

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा ; ट्रकमधून साहित्याची चोरी करणार्‍या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मुसक्या आवळल्या. दोघांकडून सुमारे १९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकमधील साहित्य चोरीच्या दोन घटना जिल्ह्यात घडल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी या घटनांची चौकशी करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी  वेगवेगळी पथक तयार करुन चौकशीसाठी रवाना केले होते. त्यानुसार पथकाला पहूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी मोबीन अहमद पटेल (वय-४७) रा. भादली हा ह. मु. कोंढवा पुणे येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पथकाने पुणे येथे जावून गुरुवारी संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे १० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

दुसर्‍या संशयिताकडून ९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत 
ट्रकमधील साहित्याची चोरी केल्यानंतर मोबीन अहमद पटेल याने तो माल त्याच्या ओळखीचा इकबाल उर्ङ्ग इकबाल टेलर अन्वर पटेल वय-४८ रा. रजा कॉलनी शेरा चौक यांना विकल्याचे चौकशीत समोर आले. त्यानुसार संशयित आरोपीस इकबाल अन्वर पटेल याला शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून सुमारे ९ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दुसर्‍या चोरीची देखील दिली कबुली
या घटनेत दोघा संशयित आरोपींकडून सुमारे १९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्या दोघा संशयितांना पहुर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तसेच यातील संशयित आरोपी इकबाल उर्ङ्ग इकबाल टेलर अन्वर पटेल याची कसून चौकशी केली असता, त्याने एमआयडीसीत केलेल्या चोरीची देखील कबुली दिली आहे.

हेही वाचा ;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT