नाशिक : लाखलगाव शिवारातील ओढा रेल्वेस्थानकाजवळील मळ्यात एकाने विष सेवन करून आत्महत्या केली. बाबू बबन जाधव (३९) असे या व्यक्तीचे नाव आहे. बाबू यांनी रविवारी (दि.२६) विष सेवन केल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांचा उपचाराआधी मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.