उत्तर महाराष्ट्र

Shiv Rajyabhishek Sohala : ३५० सोन्याच्या होनांनी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५० वे वर्ष असल्याने यंदाचा सोहळा ३५० सोन्याच्या होनांनी साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्यातील त्यांच्यावर झालेले राजमाता जिजाऊ व छत्रपती शहाजीराजे यांचे संस्कार, महाराजांचे जन्मठिकाण, त्यांची राज्य विस्ताराची ठिकाणे, पवित्र नदी अशा महत्त्वपूर्ण ठिकाणांवरून पवित्र जल आणले जात आहे. तरी लाखो शिवभक्तांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन युवराज संभाजी महाराज यांच्या वतीने करण गायकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

गायकर म्हणाले की, ५ व ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी महाराज व युवराजकुमार शहाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा साजरा होत आहे. ५ जून रोजी सायंकाळी ४ पासून महादरवाजा पूजन, तोरण बांधणे, रायगड जिल्हा प्रशासन, २१ गावांतील सरपंच, पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या हस्ते गडपूजन, धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची शिवकालीन युद्धकलांची मानवंदना, जागर शिवशाहिरांचा स्वराज्याच्या इतिहासाची शाहिरी मानवंदना, गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, जगदीश्वराचे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन. ६ जून सकाळी ७ पासून रणवाद्यांच्या जयघोषात युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण, शाहिरी कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे वाद्यांच्या गजरात आगमन, युवराज संभाजी छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व राजसदरेवर आगमन आदी कार्यक्रम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

याप्रसंगी केशव गोसावी, विजय वाहुळे, नवनाथ शिंदे, किरण डोखे, आशिष हिरे, डॉ. रुपेश नाठे, नितीन पाटील, वैभव दळवी, भारत पिंगळे, सागर जाधव, रवि धोंगडे, अनिल निकम, दादासाहेब जोगदंड, प्रवीण गोसावी, मनोरमा पाटील, पुष्पा जगताप, रेखा जाधव, रागिणी आहेर, आशा पाटील, सुलक्षणा भोसले, उलका पुरणे, रेखा पाटील, राणी कासार, सैफाली शर्मा, दीपक साळुंके, तेजस गांगुर्डे, अमोल जगळे, विशाल घागस आदी उपस्थित होते.

नाशिककरांना विशेष मान

नाशिकच्या मोरया लेजीम पथक, शिव रुद्रा वाद्य पथक, मार्तंड भैरव ढोल ताशा पथक, सिंहगर्जना वाद्य पथक, कलाक्षेत्र वाद्य पथक हे सर्व ढोल पथकांना मानवंदनेचा सन्मान मिळाला आहे. नाशिकचे भूमिपुत्र शाहीर स्वप्निल डुंबरे यांचा शाहिरी पोवाडा, वारकरी पथक, रणमैदानी खेळांचे होळीच्या माळात प्रात्यक्षिक करण्याचा बहुमान नाशिककरांना मिळाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT