पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील वसमार येथील भाऊराव रामचंद्र, आवकलाबाई भाऊराव आजगे या दाम्पत्याला पुण्यातील सुसंगत फाउंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय 'माता-पिता' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. शिकापूरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रोटरी इंटरनॅशनल तंत्रउद्योजकचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक प्रशांत देशमुख, विशेष अतिथी मारुती गलडे (संस्थापक सजाई ग्रुप पुलकोटी जि.सातारा), पुणे येथील सुसंगत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सु.भ हदे, उपाध्यक्ष पोंडीराम गडदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील धनगर यांनी केले. साक्री तालुक्यातील वसमार येथील या आजगे दाम्पत्याने अतिशय खडतर परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. सध्या त्यांचा मोठा मुलगा डॉ. रवींद्र आजगे प्राथमिक आरोग्य केंद्र मालपूर ता. शिंदखेडा येथे औषध निर्माण अधिकारी म्हणून सेवा करीत आहेत तर धाकटा मुलगा नवल आजगे हे जिल्हा कार्यक्रम समन्वयक आरोग्य विभाग जिल्हा परिषद, जळगाव येथे नोकरी करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील पनगर यांनी केले.
'आई-वडिलांचा झालेला हा सन्मान आमच्या जीवनातील अतिशय आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे अशी भावना डॉ. रवींद्र आजगे व डॉ. नवल आजगे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.