उत्तर महाराष्ट्र

नाशिक : जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विस्तारणार, ‘हे’ नवे मॉडेल विकसीत

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सार्वजनिक बांधकाम विभागाने बीओटी-टोल मॉडेलनंतरचे हायब्रिड अॅन्युइटी हे नवे मॉडेल विकसित केले आहे. या मॉडेल अंतर्गत नाशिक जिल्ह्यात सुमारे 729 कोटी खर्च करून पाच प्रमुख मार्गांचे काम प्रगतिपथावर आहे. निफाड-सिन्नर व मालेगाव-चाळीसगाव हे दोन प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हे रस्ते वाहनधारकांसाठी खुले होणार आहे. हायब्रिड अॅन्युइटी मॉडेलमुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विस्तारणार आहे.
राज्य शासनाने हायब्रिड अॅन्युइटी अंतर्गत रस्त्याचे जाळे सक्षम करण्यावर भर दिला होता. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी-वणी, मालेगाव-नांदगाव-येवला, पिंपळगाव-निफाड-सिन्नर, निफाड-चांदवड, मालेगाव-चाळीसगाव या मार्गांची कामे सुरू करण्यात आली. यातील दोन प्रकल्पांचे काम जवळपास होत आले आहे. तर उर्वरित तीन प्रकल्पांचे कामेही वेगाने सुरू आहेत. या कामांना दोन वर्षे कोरोनाचा फटका बसला होता. विशेष म्हणजे मजूर त्यांच्या मूळगावी निघून गेल्याने कित्येक दिवस काम बंद होते.

हायब्रिड अॅन्युइटीमार्गावर टोल वसुली केली जाणार नसल्याने संबंधित कंत्राटदार कंपनीला राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात प्रथमत: 40 टक्के रक्कम दिली जाईल. तर उर्वरित 60 टक्के रक्कम खासगी सहभागातून दिली जाणार आहे. 15 वर्षे रस्त्यांची देखभालही ठेकेदाराला करावी लागणार आहे.

नाशिक जिल्ह्यात हायब्रिड अॅन्युइटी अंतर्गत पाच मार्गांचे काम निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी मालेगाव-चाळीसगाव व निफाड-सिन्नर या मार्गाचे अंतिम टप्प्यात आहे. तर उर्वरित तीन प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. नव्याने होणार्‍या या मार्गांमुळे वाहनधारकांसह स्थानिकांची गैरसोय टळणार आहे.
– प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

असे आहेत पाच मार्ग….

रस्ता                                  किमी                         खर्च
दिंडोरी-वणी                          95                         214 कोटी
मालेगाव-नांदगाव-येवला        72                         152 कोटी
पिंपळगाव-निफाड-सिन्नर      54                         151 कोटी
निफाड-चांदवड                      34                        80 कोटी 75 लाख
मालेगाव-चाळीसगाव             48                         130 कोटी

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT