

पाटण : गणेशचंद्र पिसाळ
निम्म्याहून अधिक महाराष्ट्रासह कर्नाटक -आंध्रप्रदेशाला सिंचनासाठी कोयना धरणासह अन्य छोट्या-मोठ्या धरणांचा तालुका असलेल्या पाटण तालुक्यातील तब्बल 126 गावे व 97 वाड्या टंचाई प्रस्तावात असून अद्यापही पुरवणी यादी बाकी आहे. प्रशासनासह नेत्यांकडून बैठकांचा फार्स होत असला तरी प्रत्यक्षात बैठकीतील उपाययोजनांची अंमलबजावणी किती होते? हा संशोधनाचा विषय आहे.
340 महसुली गावे व 238 ग्रामपंचायत असलेल्या पाटण तालुक्यात जानेवारी ते मार्च दरम्यान पाणी टंचाई भासणार्या गावांमध्ये काठी टेक, डावरी, मधलीआळी, बौद्ध वस्ती, देवघर बीबी, पांढरे पाणी, धनगरवाडा, पिनीचावाडा, दिवशी खुर्द, मळ्याचा वाडा, चाहूरवाडी, नानेगाव, चव्हाणवाडी , तळीये पश्चिम, सुतारवस्ती, आटोली, खडकची वाघजाई, कुशी पुनर्वसन, वेखंडवाडी, सडावाघापूर, मधले आवाड, खालचे आंबवणे, ठोमसे, खोनोली, जंगलवाडी, तामीणे, पानेरी मुस्लिमवस्ती, नुने, लोरेवाडी, खराडेवस्ती, सावरघर, वजरोशी, चिंचेवाडी, तारळे, जंगलवाडी, कोंजवडे, मोगरवाडी, मुरुड, डिगेवाडी, लोरेवाडी, कडवे खुर्द, रेडेवाडी, घोट, आंबेवाडी, जुगाईवाडी, ढोरोशी, वाघळवाडी, मरळोशी, जांभेकरवाडी, वजरोशी, गव्हाणवाडी, कातवडी, कवडेवाडी, दिवशी खुर्द, कुशी पुनर्वसन, गुढे, गुरेघर जुने, घाणव, चिखलेवाडी, जमदाडवाडी, जीतकर वाडी, जोतीबाचीवाडी, ठोमसे, अंबवडे खुर्द, डोणीचीवाडी, सुतारवस्ती, काळेश्वर मंदिर, ढाणकल, घाटमाथा, आंब्रुळे, ढोपरेवाडी, तळोशी, गोवारे, पाचगणी, नागवंण टेक, पेठशिवापूर, बेलवडे खुर्द, चाफेर मुस्लिम वस्ती, बेंदवाडी, मोगरवाडी, रामेल, लेंढोरी, शिवनगर, नुने, लोरेवाडी, वरपेवाडी, गोकुळ, वीरेवाडी, धावडे, शिद्रूकवाडी, शिवंदेश्वर, धावडे, म्हाळुंगेवस्ती, कसणी, सतीचीवाडी बौद्धवस्ती, मेतेवाडी, मस्करवाडी, निनाईवाडी, कडवे, सवारवाडी, काहिर, सातवणे वस्ती, जिंती, सावंतवाडी, नीवी, राजवाडा, मरड, टोळेवाडी, धावडे, धामणी, चव्हाणवाडी, जंगलवाडी, आंब्रुळकरवाडी, किल्ले मोरगिरी, झाकडे, घोट, फडतरवाडी, शिद्रुकवाडी, शिद्रुकवाडी (वरची), उंब्रजकरवाडी, चव्हाणवाडी (ना.), रिसवड, नाव, गारवडे, जाधववाडी, सणबूर, विठ्ठलवाडी, रेडेवाडी (कडवे), केळोली बौद्ध वस्ती , खालची केळोली, मसुगडेवाडी, नानेगाव खुर्द, जंगलवाडी, खोनोली, सावंतवाडी, जिंती, कोडोली, शिद्रुकवाडी, काढणे, पानेरी बौद्धवस्ती, विठ्ठल
रुक्मिणी वस्ती, तामिने बौद्धवस्ती, वजरोशी, सुतारवाडी, सळवे, वर्पेवाडी, पाळशी, यादववाडी, सावंतवाडी, दत्त आवाड, चौगुलेवाडी (का.), सावंतवाडी, कोळकगेवाडी, मुटलवाडी, घराळवस्ती, रूवले, पाटीलवाडी, भोसगाव गावठाण, आंब्रुळकरवाडी, उधवणे गावठाण, वाढीव गावठाण, कोळेकरवाडी, सातर म्हाळुंगेवस्ती, जाधववाडी, कारळे, रामिष्टेवाडी गावठाण, काळेवाडी, चव्हाणवाडी गावठाण, घराळवाडी, कोरिवळे, शिद्रूकवाडी, कडवे बुद्रुक, बेंदवाडी, माळवाडी, तामकडे, घोटील, धार माऊली आवाड, सोनवडे, खांडेकर वाडी अशी पहिल्या टप्प्यातील 107 गावे व 84 वाड्या टंचाई प्रस्तावात आहेत.
तर एप्रिल ते जून दरम्यान दिवशी खुर्द, मळ्याचावाडा, कातवडी, जाधववाडी, जंगलवाडी, भोसगाव, आंब्रुळकरवाडी, किल्ले मोरगिरी, झाकडे, घोट, फडतरवाडी, बोर्गेवाडी, आंबेवाडी, जुगाईचीवाडी, चव्हाणवाडी (ना.), रिसवड, नाव, गारवडे, जाधववाडी (नुने), सणबूर, विठ्ठलवाडी, कडवे खुर्द, रेडेवाडी, चाफळ, जंगलवाडी, काडोली, सावंतवाडी, शिद्रूकवाडी, काढणे, आंब्रुळकरवाडी, जाधववाडी, कोरिवळे अशी 19 गावे व 13 वाड्या अशी एकूण 126 गावे व 97 वाड्या टंचाईच्या प्रस्तावात आहेत.
शासनाकडून टंचाई निर्मूलनासाठी नवीन विंधन विहिरी, टँकर भरण्यासाठी विंधन विहिरी, नळ पाणीपुरवठा विशेष दुरुस्ती, विंधन विहिरी विशेष दुरुस्ती, तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा, खासगी विहिरी अधिग्रहण, विहीर खोल करणे, गाळ काढणे, नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती आदी अनेक उपाययोजना, प्रस्ताव कागदोपत्री आहेत.