नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोबाड गांधी लिखित 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' तुरुंगातील आठवणी व चिंतन या पुस्तकाला देण्यात आलेला पुरस्कार राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने रद्द केल्याने सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ उडालेली असतानाच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनीही सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पुरस्कार दिल्याने लेखकांना ती शाबासकी असते. मात्र, देऊन पुन्हा तो रद्द करणे हे खूूप पटीने अपमानास्पद आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग हाच असांस्कृतिक झाला आहे, अशी टीका केली. नाशिकमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्या बोलत होत्या.