उत्तर महाराष्ट्र

सुषमा अंधारेंविरोधात नाशिकमध्ये निषेधाचा गजर, वारकरी संप्रदायाकडून दिंडी

गणेश सोनवणे

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, वारकरी संप्रदायाच्या थोर संतांचा आणि हिंदू धर्माच्या देव-देवतांचा अपमान करणाऱ्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काळाराम मंदिर ते रामकुंड अशी वारकरी निषेध दिंडी पार पाडली. यावेळी जिल्ह्यातील सर्व वारकरी संघटना, कीर्तनकार, गायक, वादक वृंद तसेच महिला कीर्तनकार व वारकरी बांधव उपस्थित होते.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, येथे वारकरी संप्रदायातील संतांच्या व हिंदू देवी-देवतांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल शिवसेनेने सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ वारकरी दिंडीचे आयोजन काळाराम मंदिर ते रामकुंड असे करण्यात आले होते. यावेळी संजय महाराज धोंडगे, निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे नीलेश गाढवे, गोविंद घुगे, राहुल साळुंके, सागर दिंडे यांच्यासह वारकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ज्या महिलेला देवी-देवता व वारकरी, ज्ञानोबा, तुकोबा मान्य नाही, अशी बाई आम्हालाही मान्य नाही. देवी-देवता व संतांबद्दल निंदाजनक बोलण्याचा अधिकार यांना कोणी दिला? आमची उद्धव ठाकरेंना विनंती आहे की, अशा बाईची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अन्यथा वारकरी संप्रदाय भविष्यात शिवसेनेचा त्याग करू शकतो.

-संजय महाराज धोंडगे

तीर्थ घेत संकल्प

रामकुंडातील तीर्थ हातात घेऊन सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील, त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही, असा संकल्प सोडण्यात आला. भविष्यात कोणीही अशा प्रकारे वारकरी संप्रदाय, हिंदू देवी – देवतांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करू नये. याकरिता निषेध दिंडीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT