उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये दोन हजार गुन्हेगारांच्या मागावर पोलिस

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात विविध गुन्हे करून फरार असलेल्या एक हजार ९७८ गुन्हेगारांचा शोध पोलिस घेत आहेत. त्यात शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांत ६६७, तर मालाविरुद्धच्या गुन्ह्यांत १ हजार ३११ संशयित पसार आहेत. पत्ता, नावे आणि इतर माहितीअभावी गुन्हेगारांची ओळख पटत नसल्याने संबंधित पोलिस ठाण्यांसह गुन्हे शोध पथकांना हे संशयित सापडवण्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे शोध सुरु असलेल्यांपैकी १ हजार १७८ गुन्हेगार नाशिकमधीलच असून ४५२ संशयित राज्यातील तर ३४८ परराज्यातील आहेत.

शहरातील तेरा पोलिस ठाण्यांसह सायबर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांचा शहर पोलिसांतर्फे शोध सुरु आहे. मात्र यातील अनेक गुन्हेगार अद्याप फरार असून त्यांचा शोध घेऊनही ते सापडत नसल्याने पोलिसांची शोधमोहिमही सुरुच आहे. पाहिजे असलेल्या गुन्हेगारांचे संपुर्ण नाव, घराचा पत्ता, संपर्क क्रमांक किंवा इतर महत्वाची माहिती उपलब्ध नसल्याने त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. पोलिस आयुक्तालयाने पाहिजे असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार केली असून संबंधित पोलिस ठाणे, गुन्हे शाखेतील पथकांना संशयितांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे काही दिवसांत यातील काही संशयित पोलिसांच्या हाती लागण्याची चिन्हे आहेत.

पोलिस ठाणेनिहाय पाहिजे संशयितांची नावे आणि त्यांच्या पत्त्यांच्या नोंदीनुसार शोध घेण्याच्या सूचना केल्या आहेत. काही संशयितांचे पत्ते व नावे अपूर्ण असल्याने शोधात अडचणी येतात. परजिल्हा व परराज्यातील पाहिजे असलेल्या संशयितांच्या शोधासाठी तेथील पोलिसांशी संपर्क साधून शोध घेतला जाणार आहे.

– प्रशांत बच्छाव, पोलिस उपआयुक्त, गुन्हे शाखा

पोलिस ठाणेनिहाय पाहिजे असलेले संशयित

आडगाव (७१), म्हसरुळ (१५), पंचवटी (१२४), भद्रकाली (१६७), मुंबईनाका (४८), सरकारवाडा (३२४), गंगापूर (१५३), सातपूर (९५), अंबड (३३८), इंदिरानगर (१०३), उपनगर (२०८), नाशिकरोड (२२०), देवळाली कॅम्प (११८)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT