पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
पिंपळनेरच्या जेबापुर रस्त्यावरील बालाजीनगरात घरफोडी झाल्याची घटना घडली असून या घरफोडीत चोरट्याने घरातील ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. संदीप गुलाबराव शिंदे (३८, रा. ह.मु.बालाजी नगर, प्लॉट नं.१४ ब,जेबापुररोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी, दि.29 सकाळी ६.३० दरम्यान बंद घराची संधी साधून चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले ५ ग्रॅम वजनाचे १९ हजार रूपये किमतीचे सोन्याचे टोंगल, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची ११ हजार रूपये किमतीची सोनपोत, ३ भार वजनाचे १ हजार ५०० रूपये किमतीचे पायातील चांदीचे वाळे, १५ हजाराचा एलसीडी टिव्ही, ४ हजार रूपये किमतीचा मोबाईल व २० हजाराची रोकड असा एकूण ७२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे.