उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये आणखी 8 मनसे पदाधिकार्‍यांना हद्दपारीची नोटीस

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंगे आंदोलन प्रकरणी गुरुवारी (दि. 5) शहर पोलिसांनी आणखी आठ मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कारवाई केली. आठ जणांना शहरातून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, तर ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (दि. 4) पाच कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.

बुधवारी रात्रीपासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. बुधवारी शहरातून 27 जणांना हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशीही गुरुवारी खबरदारी म्हणून मनसेच्या आठ पदाधिकार्‍यांना हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्यात श्याम गोहाड, रोहन देशपांडे यांच्यासह सचिन सिन्हा, अतुल पाटील, विशाल भावले, विजय अहिरे, मिलिंद कांबळे, योगेश लभडे यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT