कळवण (नाशिक) : तालुक्यात यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महिलाराज प्रस्थापित होणार आहे. सोमवारी (दि. १३) झालेल्या आरक्षण सोडतीनंतर तालुक्यातील सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांचा हिरमोड झाला असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महिलांचे वर्चस्व राहणार हे निश्चित झाले आहे.
नाशिक येथील कालिदास कला मंदिरात जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत पार पडली, तर पंचायत समिती गणांची सोडत मानूर येथील प्रशासकीय इमारतीच्या पंचायत समिती सभागृहात उपजिल्हाधिकारी अनुकुरी नरेश व तहसीलदार रामदास वारुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. इयत्ता पाचवीत शिकणारी धनश्री खिल्लारी हिच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
यंदाच्या सोडतीत जिल्हा परिषदेच्या सर्व चारही गटांचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे. त्यामुळे सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचायत समितीच्या आठ गणांपैकी सहा गण अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी, तर उर्वरित दोन गण सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव ठरले आहेत.
गटांचे आरक्षण
पुनदनगर : अनुसूचित जमाती स्त्री
कनाशी : अनुसूचित जमाती स्त्री
अभोणा : अनुसूचित जमाती स्त्री
मानूर : अनुसूचित जमाती स्त्री
----
गणांचे आरक्षण
कनाशी : अनुसूचित जमाती स्त्री
ओतूर : अनुसूचित जमाती
अभोणा : अनुसूचित जमाती स्त्री
पुनदनगर : अनुसूचित जमाती
मोकभनगी : अनुसूचित जमाती स्त्री
दळवट : अनुसूचित जमाती
मानूर : सर्वसाधारण स्त्री
निवाणे : सर्वसाधारण
१२ पैकी सात गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित
दिंडोरी : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी गट-गण आरक्षण सोडत जाहीर झाली असून, तालुक्यातील सहाही गट अनुसूचित जमातीसाठी, तर पंचायत समितीच्या 12 पैकी सात गण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने मातब्बरांचा हिरमोड झाला आहे. मात्र, या जागांवर आपल्या मर्जीतील उमेदवार देण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे.
दिंडोरी पंचायत समितीची आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत तहसीलदार मुकेश कांबळे यांनी काढले. 12 गणांपैकी 6 गण महिलांसाठी राखीव झाले आहेत. आरक्षण सोडतीप्रसंगी कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, बाजार समितीचे उपसभापती योगेश बर्डे, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल कदम, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळ, भाजप जिल्हा सरचिटणीस रणजित देशमुख आदींसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणनिहाय आरक्षण
टिटवे : अनुसूचित जमाती महिला, अहिवंतवाडी : अनुसूचित जमाती महिला, कसबे वणी : अनुसूचित जमाती, लखमापूर : अनुसूचित जाती, कोचरगाव : अनुसूचित जमाती महिला, नळवाड पाडा : अनुसूचित जमाती, उमराळे बु. : अनुसूचित जमाती महिला, ननाशी : अनुसूचित जमाती, खेडगाव : ओबीसी महिला, मातेरेवाडी : ओबीसी महिला, मोहाडी : सर्वसाधारण, पालखेड बंधारा - ओबीसी
गटनिहाय आरक्षण असे...
खेडगाव : अनुसूचित जमाती महिला
कसबे वणी : अनुसूचित जमाती
कोचरगाव : अनुसूचित जमाती
अहिवंतवाडी : अनुसूचित जमाती
उमराळे बु. : अनुसूचित जमाती
मोहाडी : अनुसूचित जमाती