Balanced Diet 
नाशिक

Cancer Prevention Balanced Diet | पोषक आहाराच्या मदतीने कॅन्सरवर मात शक्य

Cancer Prevention Balanced Diet | सतीश कुलकर्णी : महाराणा प्रताप जयंती व्याख्यानमाला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

योग्य, संतुलित आणि पोषक आहाराच्या मदतीने कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो आणि उपचारादरम्यान शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून कॅन्सरवर मात करण्यास मदत होते.

कोणताही विशिष्ट पदार्थ कॅन्सर पूर्णपणे बरा करू शकत नाही, परंतु अँटी ऑक्सिडंट्स आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध आहार कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यास उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन वेलनेस कोच सतीश कुलकर्णी यांनी केले. सातपूर येथील नाइस संकुलमध्ये आयोजित महाराणा प्रताप जयंती व्याख्यानमालेत ४१ वे पुष्प गुंफताना 'आपला आहारच आपले खरे औषध' या विषयावर ते बोलत होते.

व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपसिंग पाटील, व्याख्यानमाला अध्यक्ष जयपाल जमादार, जयंती अध्यक्ष सुनील पवार, जयप्रकाश गिरासे, देवयानी पाटील, सी. जी. पाटील, दिलीपसिंह बेनिवाल उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाले की, रोजच्या आहारावर लक्ष केंद्रित करून त्याची काही दिवस नियमित नोंद ठेवा. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर आहाराने मात केलेल्या अनेक व्यक्तींची नावासह त्यांनी उदाहरणे दिली. मिलेटसारख्या अन्नाचे प्राशन करणे खूप गरजेचे असल्याचे नमूद असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्रिशी राजपूत हिने सूत्रसंचालन केले. जयदीप राजपूत यांनी आभार मानले. यावेळी प्रताप ठोके, बबलूसिंह परदेशी, सुहास गिरासे, राजेंद्र पाटील, संतोष गिरासे, नितेंद्र राजपूत, राजेंद्र भऊरकर, यशपाल राजपूत, प्रदीप गिरासे, दिलीप राजपूत, संग्राम राठोड, सचिन बेलदार उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT