Vishwa Marathi Sammelan 2026  
नाशिक

Vishwa Marathi Sammelan 2026 |नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलनाची तयारी पूर्ण

Vishwa Marathi Sammelan 2026 | कविवर्य कुसुमाग्रज नगरीत होणार 'अभिमान मराठी, अभिजात मराठी' चा जयघोष

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथे चौथे विश्व मराठी संमेलन गुरुवार (दि. २६) पासून रविवार (दि. १ मार्च) पर्यंत या कालावधीत मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात 'अभिमान मराठी, अभिजात मराठी' या ब्रीदाने संमेलनाची तयारी पूर्णात्वास आली आहे.

संमेलनात सहभागी होण्यासाठी संयोजकांनी ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिली आहे. संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कविवर्य कुसुमाग्रज नगरीत विविध मंच उभारण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर मराठी भाषा विभागाने देश-विदेशातून येणाऱ्या मराठी भाषिकप्रेमींना नाव नोंदणीसाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध केली आहे. विश्व मराठी संमेलनात ३३ दालने मराठी भाषेला साहित्यापलीकडच्या दृष्टिकोनातून बघायला हवे. मराठी माणसाच्या जगण्यासोबतच शिक्षण आणि रोजगार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ही संकल्पना राबवली जात आहे.

मराठी भाषामंत्री उदय सामंत व सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा विभागाच्या उपसंचालिका अंजली ढमाळ व त्यांचे सहकारी ही संकल्पना प्रत्यक्षात आणत आहेत. संमेलनात पुस्तक प्रदर्शन मंडपात २० बाय १० फूट आकाराची ३३ दालने उभारली आहे. यात 'महाज्योती', 'सारथी', 'आर्टी', 'बार्टी' या संस्थांच्या स्टॉलमधून रोजगार संधी, शासकीय योजना, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, अर्थसहाय्य या गोष्टींवर जागृती करण्यात येणार आहे.

मराठीसाठी सर्वंकष उपक्रम मराठी

माध्यमात शिकणाऱ्या तरुणांना रोजगाराचे मार्ग उपलब्ध करून देणे, स्टार्टअप व लघु-मध्यम उद्योगाच्या माध्यमातून नव्या उद्योगांना चालना, मराठी भाषा ही केवळ भाषा न राहता ती एक अर्थार्जनाची भाषा म्हणून पुढे यावी, मराठी संवाद वाढावा आणि मराठी माणूस जोडला जावा या संदर्भात संवाद जाळे विकसित होणे, असा या उपक्रमामागील शासनाचा उद्देश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT