Vinchur MIDC 
नाशिक

Vinchur MIDC | विंचूर एमआयडीसीत 49 लाखांचे एमडी जप्त

Vinchur MIDC | ग्रामीण पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक व स्थानिक पोलिस पथकाने विंचूर एमआयडीसी परिसरात टाकलेल्या छाप्यात 1400 ग्रॅम एमडी जप्त केले.

पुढारी वृत्तसेवा

पुढारी : लासलगाव वृत्तसेवा नाशिक

ग्रामीण पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक व स्थानिक पोलिस पथकाने विंचूर एमआयडीसी परिसरात टाकलेल्या छाप्यात १४०० ग्रॅम एमडी जप्त केले. या अमली पदार्थाची किंमत ४९ लाख १० हजार रुपये आहे.

या प्रकरणी याकूब खालिद मोमीन (४६, रा. इस्लामपुरा, विंचूर) व संदेश अंबादास फापाळे (३५, रा. मरळगोई) यांना अटक करण्यात आली. विंचूर एमआयडीसी परिसरात एमडी विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. लासलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २१ गाव पाणीपुरवठा योजना बसाहतीजवळील विंचूर एमआयडीसी त्रिफुली ते एमआयडीसीकडे जाणाऱ्या रोडवर दोघांकडे एमडी असल्याची माहिती पोलिसांना दिली.

याबाबत लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांना ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. विंचूर एमआयडीसी रोडवर सापळा लावत पोलिसांनी याकूब मोमीन व संदेश फापाळे यांना एमडीसह ताब्यात घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार जप्त एमडीची किंमत सुमारे ५० लाख रुपये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT