Admin
नाशिक

Veda Knowledge - वेद हाच एक ज्ञानकुंभ : डॉ. माहुलीकर

वेद हाच एक ज्ञानकुंभ : डॉ. माहुलीकर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : वेद हा महासागर आहे. तो आपल्याला पवित्र करतो. ज्यांना प्राप्त केल्यामुळे सरस्वती कृतार्थ झाली असे म्हटले जाते, ते म्हणजे वेद होय. खरे सांगायचे, तर वेद हाच एक ज्ञानकुंभ असल्याचे प्रतिपादन चिन्मया इंटरनॅशनल फाउंडेशनच्या शिक्षण संचालक डॉ. गौरी माहुलीकर यांनी केले.

भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृती आणि वेदांचा आधुनिक जीवनशैलीशी असलेला संबंध सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी 'आयाम' नाशिकतर्फे ज्ञानकुंभ व्याख्यानमालेतील पहिले पुष्प 'वेद परिचय' या विषयावर डॉ. गौरी माहुलीकर यांनी शुक्रवारी (दि. २६) गुंफले. गंगापूर रोड, शंकराचार्य कुर्तकोटी सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात शंकराचार्य आणि भारतमाता पूजनाने झाली. त्यानंतर वेदसार शिवस्तवन स्तोत्रपठण झाले.

आयामचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर यांनी प्रास्ताविक केले. आजच्या लहान मुलांमध्ये वेद, संस्कृती रुजविण्यास आयामसारखे उपक्रम होणे आवश्यक आहे, असे नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले, तर वैदिक पारायणे आणि अग्निहोत्र पाठ असून, त्याचे अर्थ जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

येत्या जुलै महिन्यात कुंभमेळ्यावर आधारित तीनदिवसीय कार्यक्रम होणार असून, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही आध्यात्मिक कार्यक्रमाचे नियोजन असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. कार्यक्रमास आयामचे विवेक बापट, चिन्मय खेडकर, कौमुद परांजपे आदी सदस्य उपस्थित होते. विनिता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. आयामचे विश्वस्त मिलिंद कुलकर्णी यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT