Unnat Nashik Abhiyan girish mahajan  
नाशिक

Unnat Nashik Abhiyan | उन्नत नाशिक अभियान आजपासून; गिरीश महाजन यांची संकल्पना

उन्नत नाशिक अभियान आजपासून; गिरीश महाजन यांची संकल्पना

पुढारी वृत्तसेवा

स्वच्छ-सुंदर व हरित नाशिक संकल्पनेला बळकटी मिळणार

नाशिक : शहराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण करून देण्याच्या उद्देशाने 'स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक' या संकल्पनेवर आधारित उन्नत नाशिक अभियान ही व्यापक लोकचळवळ मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून उभी राहत आहे. वसुंधरादिनाचे औचित्य साधून बुधवार (दि. २२) पासून सुरू होणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून केवळ शहराच्या विकासाचा वेग वाढविणे नव्हे, तर नागरिकांचा सक्रिय सहभाग घेऊन नाशिकला एक आदर्श, शाश्वत आणि आकर्षक शहर म्हणून घडविण्याचा ठाम संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, उन्नत नाशिक अभियान हे २०२६ ते २०३० या चार वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार असून, यामध्ये स्वच्छता, सौंदर्याकरण आणि हरित उपक्रम या तीन मुख्य स्तंभांवर विशेष भर दिला जाणार आहे.

शहरातील प्रत्येक प्रभागात स्वच्छतेची पातळी उंचावणे, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण करणे, तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून नाशिकला हरित शहर बनविण्याचा व्यापक आराखडा या अभियानातून साकारला जात आहे.

नाशिकला विविध राष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये टॉप ५ मध्ये स्थान मिळवून देणे, तसेच पर्यावरण, स्वच्छता आणि वायू गुणवत्तेच्या क्षेत्रात संतुलित प्रगती साधणे, हा या अभियानाचा हेतू असल्याचे नमूद करताना नाशिकला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही एक आदर्श शहर म्हणून ओळख मिळावी, हा आमचा मनोदय असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT