नाशिक

पुस्तक लिहिण्यापेक्षा समजून घेणे खरा हेतू : वीणा गवाणकर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मुळात माझे शिक्षण कला शाखेतून झाले. विज्ञानाचे विषय समजून घेताना ते माझ्या समजूतीने, मुलांच्या भाषेत समजून घेतले. पाच वर्ष ग्रंथपाल म्हणून काम करताना अनेक पुस्तक हाताळली. संदर्भ शोधणे, अवांतर वाचन खूप करावे लागले. पुस्तक लिहिण्यापेक्षा विषय समजून घेणे हा आपला मुख्य हेतू होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी आपल्या लेखनाचा प्रवास उलगडताना केले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिक शाखेच्या वतीने ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांच्याशी ऐसपैस गप्पांचा कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात रंगला. अनंत येवलेकर यांनी गवाणकर यांच्याशी संवाद साधला.

गवाणकर म्हणाल्या की, लेखनासाठी प्रवास करतांना अनेक ठिकाणी फिरले. लोक भेटत गेली तसे आपण खूप प्रिव्हिलेज आयुष्य जगतो, असे वाटते. तर्कबुध्दी न वापरता उथळपणे बोलले जाते. पण प्रवासात भेटत गेलेली लोक डोळे उघडून देतात आणि स्वत: कोण आहे ते समजते. स्वत: छोटे होत जातो. डॉ खानखोजे, गोल्डा, रॉबी डिसिल्वा पुस्तक लिहितांनाचे अनुभव त्यांनी उलगडून सांगितले.

ललित लिहिण्याची पात्रता नाही

वेगळेपण सिध्द करणारी, मानवी जीवनाशी उन्नयन झालेल्या लोकांबद्दल नेहमी कुतूहल वाटत गेले म्हणून अशा लोकांना समजून घेवून त्यांच्यावर लिहिण्याची आवड निर्माण होत गेली. माझ्या जीवनासाठी कला आहे; कलेसाठी जीवन नाही. म्हणून माझ्यात ललित लेखनाची पात्रता नाही, असे प्रांजळ मतही त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT