नाशिक : धनराज माळी
महाराष्ट्रातील विविध बँकांमध्ये 5 हजार 856 कोटी रुपयांच्या ठेवी पडून आहेत. या ठेवी ठेवीदारांना अथवा त्यांच्या वारसदारांना परत मिळाव्यात, म्हणून भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या मार्गदर्शनाखाली देशात विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
ठेवींची आकडेवारी
वैयक्तिक खाते ठेवी 4 हजार 612 कोटी
संस्थात्मक ठेवी 1 हजार 82 कोटी
सरकारी योजना ठेवी 172 कोटी
बँक हे विश्वासार्हतेचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे नागरिक आपल्याकडील पैसे सुरक्षित राहावेत म्हणून बँक खात्यात ठेवतात. त्यात अनेक ग्राहक पेन्शर्नस असतात. कालांतराने स्थलांतर करतात अथवा काही ग्राहक ठेवलेला पैसा विसरल्याच्या स्थितीत असतात. पैसे बँकेत जमा केल्यानंतर त्या खात्यात व्यवहारही बंद पडतो. त्यामुळे बँक खाते निष्क्रिय अवस्थेत पडते. नागरिकांच्या बँक खात्यात नावावर असलेल्या, मात्र दीर्घकाळ निष्क्रिय अवस्थेत पडलेल्या आर्थिक मालमत्तांचा मागोवा घेण्यास व त्या ठेवी त्यांना परत मिळण्यासाठी ही विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
ही मोहीम बँक ठेवी, विमा हप्ते, म्युच्युअल फंड शिल्लक, लाभांश, पेन्शन या आर्थिक स्रोतांमधील आहे. या रकमेचा दावा न केलेल्या निष्क्रिय ठेवीत रूपांतर झाले आहे. साधारणत: 10 वर्षांपेक्षा अधिक काळ निष्क्रिय असलेली खाती रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीत वर्ग केली जातात. मात्र, खातेदार व त्यांच्या वारसांना ही रक्कम परत मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे.
सध्या देशात सुमारे 1.35 लाख कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांत पडून आहेत. यापैकी ठेवीदारांसाठी आवश्यक प्रक्रिया निष्क्रिय अवस्थेतील निधी परत मिळवण्यासाठी खातेदार किंवा त्याच्या वारसांनी अद्ययावत केवायसी दस्तावेजासह दावा अर्ज भरणे आवश्यक आहे. संबंधित मालमत्तेबाबत माहिती म मिळणे आवश्यक आहे.