Two-Year Extension for Industries in Gulvanch Estate
सिन्नर : तालुक्यातील गुळवंच औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारणीसाठी भूखंड घेतलेल्या उद्योजकांना मोठा दिसाला मिळाला असून, उद्योग सुरू करण्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. ही मुदत पाणी व वीज या मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्याच्या दिवसापासून लागू होणार आहे. सिन्नर इंडस्ट्रियल अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सिमा) च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
गुळवंच औद्योगिक वसाहतीत अनेक उद्योजकांनी भूखंड घेतले असले, तरी अद्याप पाणी व वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पूर्णपणे उपलब्ध नसल्यामुळे उद्योग उभारणीस अडथळे येत होते. ही बाब 'सिमा'ने एमआयडीसी प्रशासनाच्या निदर्शनास वारंवार आणून दिले होती. यासंदर्भात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, तत्कालीन सहायक कार्यकारी अधिकारी कुंभार, उपकार्यकारी अधिकारी घोडके तसेच विभागीय अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
दरम्यान, सिमाच्या कार्यालयामध्ये गुळवंच आयोजित बैठकीत औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. विभागीय अधिकारी दीपक पाटील यांनी उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी सुमित शिंदे, आजिनाथ भोळे, अनिल आनप, श्रीकांत आव्हाड, दत्ता तांबे आदी उद्योजक उपस्थित होते.
मूलभूत सुविधांवर भर सिन्नर शहरातील सुमारे ३०० मीटर जलवाहिनीचे काम प्रलंबित असल्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी नगर परिषदेला सूचना देण्यात आल्याचे दीपक पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात संबंधित कार्यकारी अभियंत्यांना आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गुळवंच औद्योगिक वसाहतीतील वीजपुरवठ्याचा प्रश्नही प्राधान्याने सोडविण्यात येणार असून, विभागीय कार्यालयामार्फत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मूलभूत सुविधांवर भर
सिन्नर शहरातील सुमारे ३०० मीटर जलवाहिनीचे काम प्रलंबित असल्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी नगर परिषदेला सूचना देण्यात आल्याचे दीपक पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात संबंधित कार्यकारी अभियंत्यांना आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गुळवंच औद्योगिक वसाहतीतील वीजपुरवठ्याचा प्रश्नही प्राधान्याने सोडविण्यात येणार असून, विभागीय कार्यालयामार्फत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली