Woman abuse Pudhari
नाशिक

Tribal Woman Assault Case | पंचवटीत आदिवासी तरुणीवर सामूहिक अत्याचार; म्हसरूळ पोलिसांकडून दोन्ही नराधमांना बेड्या

Tribal Woman Assault Case | १४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
पंचवटी परिसरातील पवार चाळ येथे १९ वर्षीय आदिवासी तरुणीवर सामूहिक अत्याचारप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यासह अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने १४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील असून, सध्या मखमलाबाद परिसरात मजुरीचे काम करते. १० ऑक्टोबरला रात्री तिची प्रकृती बिघडल्याने विक्रम शाह याने तिला पंचवटीतील एका क्लिनिकमध्ये नेले. त्यानंतर ग्लुकोज पावडर देण्याच्या बहाण्याने तिला आपल्या घरी नेत तिथे त्याने आणि त्याचा साथीदार अशोक शाह या दोघांनी लैंगिक अत्याचार केले.

तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीने म्हसरूळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी ११ ऑक्टोबरला विक्रम कुमार इंद्रजित शाह (२५) आणि अशोक चंद्रिका शाह (३६) या दोघांना अटक केली आहे. दोन्ही नवनाथ नगर, पेठ रोड येथे राहत असून ते मूळचे बिहारमधील गोपालगंज येथील आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक मयूरी तुरे-बयस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT