Arrest Pudhari
नाशिक

Nashik Crime News | गौतमऋषी प्रदक्षिणा मार्गावर महिलांना लुटणारी टोळी जेरबंद

Nashik Crime News | घोटी पोलिसांची कारवाई : सहा संशयित युवकांवर दरोड्याचा गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

घोटी/इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर महिला भाविकांवर झालेल्या दरोड्याच्या घटनेचा घोटी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावून सहा आरोपींना अटक केली आहे. या तत्पर कारवाईमुळे भाविकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातीलराहुरी येथील काही भाविक महिला त्र्यंबकेश्वर येथे दर्शन, तसेच कुशावर्त येथे स्नान करून गौतमऋषींच्या दर्शनासाठी प्रदक्षिणा मार्गावर जात होत्या.

पहाटे अडीचच्या सुमारास संशयित युवकांनी महिलांना अडवून मानेवर चाकू लावून काठ्यांनी मारहाण करून दमबाजी, शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, हातातील रोख रक्कम तसेच मोबाइल असा जवळपास दीड लाखाचा ऐवज हिसकावून तेथून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच घोटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती घेत तपास सुरू केला. राहुरी अहिल्यानगर येथील कीर्ती प्रभाकर शिंदे यांच्यासह अंजली संपत खाडे, भारती शिवाजी शिंदे, पूजा दत्तात्रय शिंदे, मुक्ता किशोर शिंदे, सुजाता रामेश्वर शिंदे, चंद्रकला शरद शिंदे, अनिता गोविंद शिंदे (सर्व रा, जापत, पो. लाख, ता. राहुरी, जि प्रदक्षिणा करीत होत्या. अहिल्यानगर) या प्रदक्षिणा मार्गावर कीर्ती प्रभाकर शिंदे यांनी याबाबत घोटी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा संशयितांविरोधात दरोडा व लूटमारीबाबतचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या म ार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण उदे, पोलिस कर्मचारी सतीश शेलार, संतोष नागरे, लक्ष्मण धकाते, श्रावण साळवे, प्रकाश कासार आहेर, सनी भवर, अनिकेत मोरे, गौरव सोनवणे आदींच्या पथकाने तपास करत सहा संशयित आरोपी जेरबंद केले.

अटक केलेले संशयित आरोपी

या दरोडा प्रकरणात चेतन रामदास गुंड (२२), वैभव रंगनाथ झोले (२०), नवनाथ सुक्रा गुंड (२७), अमोल गुंड (२१) चौघेही रा. धाडोशी, तसेच अनिल जाधव (२३), पांडुरंग जाधव (२४) दोघेही रा. झारवड खुर्द, ता. त्र्यंबकेश्वर अशी संशयितांची नावे आहेत. अवघ्या चोवीस तासांत या सर्व संशयितांना जेरबंद केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना : त्र्यंबकेश्वर फेरीमार्गावर गौतमऋषी मंदिराच्या अलीकडे रस्त्यावर धाडोशी शिवारात हा प्रकार घडल्याने महिलांमध्ये घबराट निर्माण झाली होती. याआधीही प्रदक्षिणा मार्गावर भाविकांना लूटमारीच्या घटना घडल्या होत्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT