Pregnant Women Pudhari
नाशिक

Ashram Shala Controversy | गरोदर विद्यार्थिनीला आश्रमशाळेने काढले बाहेर

Ashram Shala Controversy | देवगाव येथील आश्रमशाळेतून गरोदर विद्यार्थिनीला काढले बाहेर; संशयित विधिसंघर्षित बालकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील देवगाव आश्रमशाळेत इयत्ता ८ वीच्या वर्गातील मुलगी गरोदर राहिल्याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात संशयित विधिसंघर्षित बालकावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे (पोक्सो) गुन्हा दाखल झाला आहे.

तर या मुलीला जून महिन्यात शाळेने दाखला देऊन काढून टाकले आहे. याबाबत देवगाव आश्रमशाळेवर काय कारवाई करणार, असा प्रश्न एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी उपस्थित केला आहे.

पीडित मुलगी शाळेत जात नाही म्हणून आशा सेविकेने तिची खोदून चौकशी केली असता दीड महिन्यांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांनी याबाबत घोटी पोलिस ठाण्यात कळवले व एमएलसी दाखला घेऊन नाशिक जिल्हा रुग्णालयात १० जून २०२६ रोजी उपचार घेण्यासाठी दाखल केले.

तथापि मुलगी अल्पवयीन असल्याने वडिलांचे आधारकार्ड आवश्यक होते, ते उपलब्ध झाले नाही. त्यामुळे पीडितेच्या आवश्यक तपासण्या झाल्या नाहीत व ती घरी निघून आली. याबाबत माहिती मिळाल्याने एल्गार कष्टकरी संघटनेने आवाज उठवला व त्यानंतर दीड महिन्याने पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

घटना उघड झाल्यानंतर पीडित मुलीला बाल संरक्षण गृहात दाखल करणे आवश्यक होते. तसेच पोलिसांत ही घटना कळल्यानंतर त्या मुलीला संरक्षण मिळणे गरजेचे होते, मात्र तसे घडले नाही याबाबत एल्गार कष्टकरी संघटनेने खेद व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT