Minor wife harassment Beed : अल्पवयीन पत्नीचा छळ व विनयभंग; पतीसह पाच जणांवर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल

या गंभीर प्रकाराबाबत '१०९८' या चाइल्ड हेल्पलाइनवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून माहिती दिली
Woman Harassment Case
Woman Harassment CasePudhari
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : पतीकडून शरीरसुखाच्या मागणीसाठी सतत होणारी जबरदस्ती, मारहाण आणि शिवीगाळ सहन करणाऱ्या एका अल्पवयीन विवाहितेच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरे आणि स्वतःच्या आई-वडिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा पुढील तपासासाठी केज पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, केज शहरातील एका १२ वी उत्तीर्ण झालेल्या १७ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह ९ मे २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता तिच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी जबरदस्तीने लावून दिला होता. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रामवाडी येथील कृष्णा अभिमान कसबे या तरुणासोबत केज येथील 'कृष्णा मंगल कार्यालय' येथे हा बालविवाह पार पडला होता.

Woman Harassment Case
Kalyan Minor Girl Assault : कल्याण पुन्हा हादरले! ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; ५५ वर्षीय नराधमाला काही तासांतच बेड्या

लग्नाच्या दोन महिन्यांनी छळ आणि गुन्हा दाखल

लग्नानंतर पीडित अल्पवयीन मुलगी दोन महिने रामवाडी (ता. कळंब) येथे राहत होती, तर तिचा पती मुंबईत होता. दोन महिन्यांनी पती तिला मुंबईतील मालाड ईस्ट, जाम ऋषी नगर, वाघेश्वरी नगर (कुरारगाव) येथे घेऊन गेला. तिथे गेल्यावर पतीने तिच्याकडे शारीरिक संबंधांसाठी सतत जबरदस्ती सुरू केली. पीडितेने यास नकार दिला असता, पतीने तिला मारहाण, शिवीगाळ करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला.

Woman Harassment Case
Chhatrapati Sambhajinagar Crime: इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; १७ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार, तरूणावर गुन्हा दाखल

'चाइल्ड हेल्पलाइन' आणि महिला बालविकास अधिकाऱ्यांची तत्परता

या गंभीर प्रकाराबाबत '१०९८' या चाइल्ड हेल्पलाइनवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून माहिती दिली. ही माहिती महिला व बालविकास कार्यालयाच्या मीरा गुंडिले यांना मिळताच, त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नेहा पेंडणेकर आणि बालहक्क समितीच्या श्रीमती सुमेधा यांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट दिली. तिथे त्यांनी 'आपण मतदान अधिकारी आहोत' असे सांगून अत्यंत चाणाक्षपणे सर्व खरी माहिती गोळा केली. यानंतर त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन थेट मुंबईतील कुरार पोलीस ठाणे गाठले.

Woman Harassment Case
Kalyan Minor Girl Assault : कल्याण पुन्हा हादरले! ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; ५५ वर्षीय नराधमाला काही तासांतच बेड्या

'पोक्सो' आणि बालविवाह प्रतिबंधक कलमान्वये गुन्हे

दिनांक १० जुलै रोजी मुंबई ईस्ट येथील महिला व बालविकास अधिकारी नेहा पेंडणेकर आणि बालहक्क समितीच्या सुमेधा यांनी पीडितेला सोबत घेऊन कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने, कुरार पोलिसांनी शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवून तो केज पोलिसांकडे वर्ग केला. केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३५०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), ३५१(२), ३५२ व ७४ (विनयभंग), बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९, १०, ११ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news