Death Pudhari
नाशिक

Nashik Ends Life News| नाशिक शहरात एकाच दिवशी तीन जणांच्या आत्महत्येने उडाली खळबळ; वेगवेगळ्या घटनांमुळे परिसरात शोककळा

Nashik Ends Life News| विषप्राशनाचे दोन, तर गळफासाची एक घटना

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर, परिसरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी तीन जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात दोघांनी विषारी औषध सेवन केले, तर एका व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवले. तिन्ही घटनांमध्ये संबंधितितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

एकाच दिवशी घडलेल्या या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये आकस्मिक मृत्यूच्या नोंदी झाल्या आहेत.आत्महत्येची पहिली घटना भगूर येथे घडली. बाळू मल्हारी गुडेकर (४८, रा. श्रीराम मंदिर रोड, भगूर) यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले.

प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांचे पुतणे अविनाश गुडेकर यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

दुसरी घटना मखमलाबाद रोड येथे घडली. बाळकृष्ण सुरेश डगळे (२२, रा. लीला अपार्टमेंट, भोईर मळा, पंचवटी) यांनी विषारी औषध सेवन केले. हे लक्षात आल्यानंतर त्यांचे मेहुणे भारत तुकाराम व्यवहारे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

तिसरी घटना अंबड येथे घडली. अक्षय रवींद्र बागले (३२, रा. ऋग्वेद् सोसायटी, अंबड) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांचे भाऊ प्रसाद कैलास बागले यांनी त्यांना तातडीने सिह्विल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. या तिन्ही घटनांमुळे भगूर, पंचवटी आणि अंबड परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये २२ ते ४८ वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे.

तिन्ही घटनामागील नेमक्या कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. संबंधित पोलिस ठानांकडून घटनांची नोंद घेऊन अधिक तपास सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून, अचानक घडलेल्या या घटनांमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT